अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी युवकास जामीन मंजूर

सोलापूर – प्रतिनीधी 

यात आरोपी नामे ज्ञानेश्वर परमेश्वर होळंबे, रा बीड यास अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी रुपये ५०,००० च्या

जातमुचलक्यावर जामीन मंजुर केला.

यात हकिकत अशी की, दिनांक १३/१०/२०२३ रोजी फिर्यादीने त्यांच्या मुलीचे अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने अपहरण तक्रार संबंधित पोलिस स्टेशन ला दिली. त्यानुसार अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर पोलीस तपासामध्ये असे निष्पन्न झाले कि, यातील आरोपी नामे ज्ञानेश्वर परमेश्वर होळंबे, रा बीड तरुणाने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून व लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे समजले आणि आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानुसार पोलीसांनी सदर पिडीतेचा कसुन शोध घेतला असता त्याना सदर पीडिता व आरोपी हे मेंढाली नरसापूर तालुका मालूर, बेंगळुरू येथे एकत्रितरित्या राहत असल्याचा सुगावा लागला त्याप्रमाने पोलीसानी सदर पीडीता व आरोपीस बेंगळुरू येथून ताब्यात घेतले.

यातील आरोपी नामे ज्ञानेश्वर परमेश्वर होळंबे याने जामीन मिळण्याकामी ॲड. अभिजीत इटकर यांच्यामार्फत सोलापुर येथील सत्र न्यायालय येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला.

ALSO READ  पंढरपूर सिंहगड संत गाडगे महाराज यांना अभिवादन

यात आरोपीतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, सदर पीडितेचे वय पाहता तिस फूस लावण्याचा संबंध येत नाही तसेच सदर आरोपी व पिडीतेचा एकत्रित सोलापुर ते बेंगळुरू हा प्रवास पाहता पिडीतेचे अपहरण केले होते असे म्हणता येणार नाही. सदरचा प्रकार निव्वळ प्रेम संबंधातून झालेला आहे असा युक्तीवाद आरोपीतर्फे करण्यात आला. त्यापोटी आरोपीच्या वकिलांनी अनेक उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.

सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा. सत्र न्यायाधीश यांनी आरोपी नामे ज्ञानेश्वर परमेश्वर होळंबे, रा बीड याची जामीनावर मुक्तता केली.

यात आरोपी तर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. सानप, ॲड. संतोष आवळे, ॲड. राम शिंदे, ॲड. फैय्याज शेख, ॲड. शिवाजी कांबळे, ॲड. सुमित लवटे, यांनी काम पाहिले.

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000