दैनिक तुफान क्रांती.
इंदापूर:(दि.७ फेब्रुवारी)
इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने चोरीस गेलेल्या तेरा मोटार सायकली हस्तगत केल्या असून दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली. इंदापूर बस स्टॅन्ड येथून एक युनिकॉर्न मोटरसायकल चोरीस गेले बाबत इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी गुन्हे शोध पथकास सुचना करून तपासास सुरुवात केली. गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना फिर्यादीच्या मदतीने संशयित आरोपी बाबासाहेब नारायण राऊ (वय २७ रा. शेज बाभूळगाव,ता.मोहोळ)यास ताब्यात घेतले.त्याचबरोबर मुद्देमाल जप्त केला .त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार गणेश भारत हेळकर (वय वर्ष २७ रा. अंकोली ता. मोहोळ, जि. सोलापूर) याचा शोध घेऊन त्याला अटक केली. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून इतर १२ मोटारसायकली जप्त केल्या. अधिक तपास करता सदरचे इसम फायनान्स कंपनीचे आहोत असे भासवून लोकांना चोरून आणलेल्या गाड्या विकत असत, व मिळेल तेवढे पैसे घेऊन काही काळाने कागदपत्रे येताच गाडी नावावर करून देतो अशी बतावणी करत. अधिक तपास केला असता तेरा पैकी आठ गुणे उघडकीस आले. त्यामध्ये टेंभुर्णी, मोहोळ,अकलूज,सलगर वस्ती,दौंड, कुर्डूवाडी येथील गुन्ह्यातील गाड्यांचा समावेश आहे.सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव,बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड,इंदापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पो.स.इ.राळेभात, स.फौ. प्रकाश माने,पो.ना.सलमान खान,पो. ना.रासकर पो.शि.चौधर,पो.शि.जाधव यांनी केली.अधिक तपास स.फौ.प्रकाश माने करत आहेत.