भिती
अंधाराच्याजाणीवे
धडधड करे छाती
छातीमधे दाटलेली
उगाअनाहूत भिती
दिवाभिता भासे रे
भिती दिवसा राती
अस्वस्थता दृढकरे
भिती सोबत नाती
भोवतालं बांधतोयं
भिंतीच्याचं भिंती
भित्यापाठी फिरती
ब्रह्म राक्षस भोवती
आपल्या पावूलाचा
आवाज येतो किती
आपल्या सावलीची
आपणा का अधृति
भयचकीत विस्मय
अ स्थिर मनस्थिती
स्वताबोलवे संकटा
असहाय परिस्थिती
आमंत्रण विना येती
अडचणीचे अतिथी
तयार असे आपत्ती
ना काळ वेळ तिथी
सोडावे भय पूर्णतः
जागवा अंतर्ज्योती
गायब होईलं भिती
पहा प्रकाशा मागुती
-हेमंत मुसरीफ पुणे.