सांगोला दि :3/2/2024
येथील रामकृष्ण टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या हिवाळी परीक्षा 2023 मध्ये विशेष यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 3/2/2024 रोजी संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्था जनरल बॉडी सदस्य डॉ. बाबासाहेब देशमुख, सांगोल्याचे तहसीलदार श्री.संतोष कणसे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड व सचिव श्री. अंकुशराव गायकवाड यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे डॉ. बाबासाहेब देशमुख व सांगोल्याचे तहसीलदार श्री. संतोष कणसे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत प्राचार्य डॉ.आर. ए. देशमुख यांनी निकालाचे वाचन केले. हिवाळी परीक्षा 2023 मध्ये 90% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या एकूण 56 विद्यार्थ्यांना तसेच विविध विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या एकूण 22 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या आशुतोष कोडग, शुभम माने (प्रथम क्रमांक), वैष्णवी भोसले( द्वितीय क्रमांक) व मेहुल शिंदे (तृतीय क्रमांक) यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनुक्रमे 4000 हजार,3000 हजार व 2000 रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. द्वितीय वर्षातील सानिका पवार, वैष्णवी चक्रे व स्वप्नाली पाटील यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांनाही 5000 हजार,3000 हजार व 2000 हजार रुपयाचे बक्षीस व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तृतीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या प्रतीक्षा हासबे, मोनाली फराटे व आकाश रुपनर या विद्यार्थ्यांनाही अनुक्रमे 5000,3000 व 2000 हजार रुपये रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याबरोबरच तिन्ही वर्षांतील 90% पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या एकूण 38 विद्यार्थ्यांना रोख रुपये 1000 व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विविध विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणाऱ्या एकूण 22 विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व संस्थेचे विश्वस्त यांच्या हस्ते रुपये 1000 रोख व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी संस्थेचे अध्यक्ष,सचिव व विश्वस्त मंडळ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करावा , समाज माध्यमावर जास्त वेळ कार्यरत राहू नये, याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे असा सल्ला डॉक्टरकीच्या नात्याने दिला. यावेळी सांगोला तालुक्याचे तहसीलदार श्री. संतोष कणसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर येणाऱ्या समस्या स्वतःलाच सोडवाव्या लागतील व पुढे जाण्यासाठी स्पर्धेसाठी नेहमी तयार राहावे लागेल असाही मौलिक सल्ला त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त श्री. एम. आर. गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून कठोर मेहनत करावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सदर बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी सांगोला, मंगळवेढा व जत तालुक्यातील विविध प्रशालेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी नस्टे सर यांनी मुख्याध्यापकांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या मनोगतात संस्थेचे अध्यक्ष, सचिव व विश्वस्त मंडळाने ग्रामीण भागात गोरगरिबांच्या मुलांसाठी दर्जेदार तंत्र शिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. विविध विभागातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबुराव गायकवाड यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश उल्लेखनीय असून त्यांनी संस्थेची असलेली यशाची उज्वल परंपरा पुढे नेण्याचे काम केले आहे. विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश त्यांनी घेतलेली मेहनत, कॉलेजच्या व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिलेला सर्व शैक्षणिक सुविधा, शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षा याचे फलित असून येणाऱ्या काळातही या संस्थेतील विद्यार्थी यशाचे शिखर गाठतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव, श्री. अंकुशराव गायकवाड, ज्येष्ठ विश्वस्त श्री. एम. आर. गायकवाड, डॉ. यशोदीप गायकवाड, सौ. अनुराधा गायकवाड व सौ. विद्या जाधव उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांचे पालकही आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.डी बावचे यांनी केले तर आभार प्रा. पी.सी. चव्हाण यांनी मानले