दुपारी 12 वा. सांगोला शहरात पदयात्रेचे आयोजन
सांगोला:
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ सोमवार दि.18 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वा.पदयात्रेचे आयोजन व तसेच जाहीर सभेेचे आयोजन दुपारी 2 वा. करण्यात आले असल्याची माहिती शेकापचे शहर चिटणीस व माजी नगरसेवक अॅड.भारत बनकर यांनी दिली. सदरच्या पदयात्रेत डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख हे सहभागी असणार आहेत.
सदरची पदयात्रेची सुरुवात मेन रोड येथील मारूती मंदिर येथून सुरूवात करण्यात येणार आहे. पदयात्रा कुंभार गल्ली, महादेवी गल्ली, डबीर चौक, देशपांडे गल्ली, खडतरे गल्ली, मुजावर गल्ली, बी.एस.एन.एल ऑफीस परिसर, कोष्टी गल्ली, जुना बेले वाड्यासमोरून, मणेरी गल्ली, परीट गल्ली, मठाचा बोळ, मारूती मंदिर परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पदयात्रेची सांगता जाहीर सभेत होणार आहे. तरी सांगोला शहर व परिसरातील महाविकास आघाडी-इंडिया अलायन्समधील सर्व मित्रपक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही तालुका चिटणीस दादाशेठ बाबर व अॅड.भारत बनकर यांनी केले आहे.