शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई डॉ. अनिकेत देशमुख यांची शेकापच्या चिटणीस मंडळ सदस्यपदी निवड

सांगोला:
शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई डॉ. अनिकेत देशमुख यांची शेकापच्या चिटणीस मंडळ सदस्यपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र कार्यालयीन चिटणीस भाई अ‍ॅड. राजेंद्र कोरडे यांनी दिले आहे.
पक्षाचे काम करत असताना डॉ.अनिकेत देशमुख यांनी गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये मध्यवर्ती समिती मध्ये काम केले आहे. त्यांच्या कार्याचा अनुभव व केलेले काम पाहून चिटणीस मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
शुक्रवार दि. 02 आणि शनिवार दि. 03 ऑगस्ट 2024 रोजी पंढरपूर येथे शेतकरी कामगार पक्षाचे राज्य अधिवेशन संपन्न झाले. राज्य शेतकरी, कामगार, विद्यार्थी, अदिवाशी इतर सर्व समावावेशक अनेक ठराव घेण्यात आले, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ व मध्यवर्ती समिती सदस्यांच्या निवडी ही करण्यात आल्या. पक्षाचे सरचिटणीस म्हणून पुन्हा भाई जयंत पाटील निवड झाली आहे. तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून संघर्ष करणार्‍या डॉ.अनिकेत देशमुख यांची राज्य चिटणीस मंडळात नव्याने संधी मिळाली आहे, यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
डॉ.अनिकेत देशमुख यांना सर्वसामान्याच्या प्रश्नावर सातत्याने लाल झेंडा घेऊन आवाज उठवणारा, शेतकर्‍यांच्या प्रश्नावर काम करणारा चेहरा म्हणून त्यांना ओळखले जाते. स्व.डॉ.भाई गणपतराव देशमुख यांचे नातू व 2019 सालचे शेकापचे सांगोला विधानसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांची सर्वानुमते निवड झाल्यामुळे प्रमाणिक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. डॉ.अनिकेत देशमुख हे 2019 पासुन पक्षात सक्रिय आहेत, ते शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर सतत आवाज उठवत असतात. शेतकर्‍यासह सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न तडीस लावले असून शेतकर्‍यांसाठी अनेक सामाजिक उपक्रमही त्यांनी राबविले आहेत. डॉ.अनिकेत देशमुख यांच्या निवडी मुळे पक्षास एक लढवय्या युवा नेता मिळाला आहे.
चिटणीस मंडळावर निवड झाल्यामुळे माझी जबाबदारी वाढली असून पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये चांगल्याप्रकारे मी सहभागी होणार आहे. चिटणीस मंडळामध्ये माझ्यासारख्या तरुणाचा समावेश केल्यामुळे तसेच मध्यवर्ती कमिटीमध्ये माझ्यासारख्या सामाजिक काम करु इच्छिणार्‍या अनेक तरुणांना संधी दिलेली आहे. त्यामुळे पक्षाकडे तरुण कार्यकर्त्यांचे आकर्षण वाढणार आसल्याचे डॉ.अनिकेत देशमुख यांनी सांगत स्व.आबासाहेब मोठ्या विश्वासाने आणि जनतेने ठेवलेला विश्वासावर माझ्याकडे दिलेली जबाबदारी न खचता यापुढील काळात पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ALSO READ  अपक्ष उमेदवार धनाजी दत्तात्रय पारेकर यांचा डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा..

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000