तुफान क्रांती/दौंड:
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील केडगाव चौफुला येथील हॉटेल रघुनंदन येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमरास जेवणासाठी थांबले होते त्यावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या बंडू उर्फ गजानन काळवाघे याने फिर्यादी शरद डांगे यांना चाकू दाखवून जमिनीच्या व्यवहारातून विसार म्हणून आणलेले ५० लाख रुपये असलेली पैशाची बॅग जबरदस्तीने काडून घेऊन पळून गेला असल्याची फिर्यादी यांनी माहिती दिल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांच्या पथकाने बंडू काळवाघे व त्याच्या सोबतचे इतर दोन अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तांत्रिक विश्लेष्णाद्वारे नाव्हरा रोडने शिरूर बाजूकडे जात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांचा पाठलाग करत शिरूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीने नाव्हरा फाटा येथे आरोपी बंडू उर्फ गजानन सुरेश काळवाघे वय ४० वर्ष रा. बुलढाणा चैतन्यवस्ती ता. जि. बुलढाणा यास गुन्ह्यातील चोरी केलेली ४५ लाख रुपये रक्कम बारा तासांच्या आत हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती यवत पोलिसांनी दिली असून पुढील तपास यवत पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे करित आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव,एस. डी. पी. ओ. अण्णासाहेब घोलप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख,स्था. गु. शा. चे सपोनि राहुल गावडे, पोसई अमितसीद पाटील, प्रदीप चौधरी, यवत पोलिस स्टे. सपोनि प्रवीण संपांगे, शिरूर पो. स्टे. चे पोसई अभिजित पवार, स्था. गु. शा. चे अंमलदार तुषार पंदारे, राजू मोमीन, जनार्दन शेळके, संजू जाधव, असिफ शेख, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन,धीरज जाधव यवत पो. स्टे. चे अंमलदार भानुदास बंडगर, रामदास जगताप, महेंद्र चांदणे, राजीव शिंदे, दत्ता काळे, प्रमोद गायकवाड, विकास कापरे, गणेश मुटेकर, शिरूर पो. स्टे. चे अंमलदार नारायण जाधव, विकी यादव, तसेच नियंत्रण कक्ष पुणे पुणे ग्रामीण येथिल मपोसाई भाग्यश्री जाधव, महिला अंमलदार बी. एन. दळवी, पोहवा चंद्रकांत भोसुरे यांनी केली आहे.