वार्ताहर:
इमारतीचे थकीत भाडे मागितल्यचा राग आल्याने प्रा. ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांना त्यांचे नात्यातील लोकांनीच जबरी मारहाण करून जिवे मारण्याच्या प्रयत्नाला आले अपयश. या बाबत सविस्तर वृत्त असे की.राहता तालुक्यांतील मूळचे साकुरी येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त प्रा.ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे यांची मालकीची राहुरी फॅक्टरी येथे असलेली दुमजली इमारत त्यांचे नातेतील लोकांना डॉ.वसतिगृह चालविणे करिता भाड्याने दिली होती. सदर ची इमारत नातेवाईकानी 1/12/2009 ते दि 28/5/2011 या प्रमाणे 30 महीने डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह करिता शासनास इमारत दाखऊन मान्यता मीळऊन घेतली.आणि त्यांनी त्यांचे राहते घरी सदरचे वसतिगृह भाडे न देता स्थलांतरित केले.या बाबत बनसोडे यांनी सतत वारंवार आपले थकीत इमारत भाडे मागणीचा तगादा लावत असतानाच थकीत भाडेमागीतल्याचा राग धरून .सदरचे नातेवाईक अनुक्रमे-
1) श्री भाऊसाहेब कोंडी राम साठे
2) श्री सखाराम कोंडी राम साठे
3) कोंडीराम राघु जी साठे
4) सौ. भामाबाई कोंडी राम साठे
सर्व राहणार वांबोरी. ता.राहुरी.जिल्हा.अहमदनगर यांनी ज्ञानेश्वर बनसोडे यांचे राहते घरी येऊन त्यांना खुनाची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करून खाली पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व जिवे मारण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांनी जिवाच्या आकांताने तेथून पळ काढला व त्वरित राहता पोलीस स्टेशन येथे संबंधितावर गुन्हा नोंदउन सरकारी दवाखान्यात उपचार घेतले आहे. या पूर्वीही याच कारणावरून प्रा.ज्ञानेश्वर बनसोडे यांनी अनेकदा मारहाण करण्यात आली आहे.