माढ्याचा गड धैर्यशील मोहिते पाटलांनी जिंकला! शरद पवारांनी भाजपला दाखवला कात्रजचा घाट!

माढा:
माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहीते पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यांना 6 लाख 18 हजार 566 मते मिळाली आहेत. तर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ४ लाख 99 हजार 171 मते मिळाली. 1 लाख 19 हजार 395 मतांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. राष्ट्रीय समाज पार्टी पक्षाच्या उमेदवाराने घेतलेल्या मतामुळे देखील रामराजे यांना फटका बसला. रामचंद्र मयप्पा घुटुकडे यांना 58 हजार 344 मते मिळाली आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात यावेळी चांगलाच चर्चेत आला. जागावाटपावरुन महायुतीतच अंतगर्त वाद झाले होते. यामुळे भाजपची कोंडी झाली होती. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून माढ्याची ओळख आहे. या मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाल्यानंतर शरद पवार येथून खासदार झाले होते. विजयसिंह मोहिते-पाटील २०१४ मध्ये खासदार झाले होते. पुढे मोहिते-पाटलांनी २०१९ ला भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपने यावेळी पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या उमेदवारीला मोहिते-पाटील व फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकर यांनी मोठा विरोध केला होता. तरी भाजप आपल्या निर्णयावर ठाम होती. शेवटी धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेऊन माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात दंड थोपटले.
विधानसभानिहाय परिस्थिती-
माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघानी बनला आहे. सोलापूर जिल्ह्यातील, करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि माण–खटाव या तालुक्यांचा माढा लोकसभा मतदारसंघात समावोश होतो. करमाळा येथे संजय शिंदे हे आमदार आहेत. माढा येथून बबनदादा शिंदे, सांगोला येथे शिंदेंच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील, माळशिरसमधून राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे माढ्यात महायुतीचे वर्चस्व आहे.
सोलापूर जिल्हा
• २४४ – करमाळा विधानसभा मतदारसंघ
• २४५ – माढा विधानसभा मतदारसंघ
• २५३ – सांगोला विधानसभा मतदारसंघ
• २५४ – माळशिरस विधानसभा मतदारसंघ
सातारा जिल्हा
• २५५ – फलटण विधानसभा मतदारसंघ
• २५८ – माण विधानसभा मतदारसंघ
आमदार कोण व कोणत्या पक्षाचे आहेत?
माढा विधानसभेत आमदार बबन शिंदे हे सध्या अजित पवार गट म्हणजे महायुतीचे आहेत. करमाळ्यात संजय शिंदे अपक्ष म्हणून निवडून आले होते, मात्र ते अजित पवार गटाच्या बाजूने असल्याचे बोलले जाते. करमाळ्यातील रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माण – याठिकाणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत. फलटण – इथे अजित पवार गटाचे दीपक चव्हाण आमदार आहेत. माळशिरस – राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत. सांगोला या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आमदार आहेत.
माढा लोकसभेत कोणते मुद्दे गाजले –
कृष्णा-भीमा स्थिरीकरणासह सिंचनाचे प्रश्‍न, मोहिते-पाटील, निंबाळकरांचा विरोध कुठपर्यंत टिकणार?, ‘शेकाप’चे डॉ. अनिकेत देशमुख पवारांचे उमेदवार असण्याची शक्यता, नेते सोडून गेले तरीही शरद पवारांचा मतदारसंघावर प्रभाव कायम या मुद्द्यांवर निवडणूक गाजली. भाजपमध्ये झालेली अंतर्गत धुसफूस देखील चर्चेचा विषयी होतात.
किती मतदान झाले?
माढ्यात मात्र कायमच चुरस असते. माढ्यात २०१४ मध्ये ६३.७१, २०१९ मध्ये ६३ टक्के तर २०२४ मध्ये ६३.६५ टक्के मतदान झाले आहे. सोलापूरच्या तुलनेत माढा पुन्हा एकदा आघाडीवर राहिल्याचे दिसले. मागील निवडणुकीच्या तुलनेत माढ्यात ०.६५ टक्के मतांची वाढ झाली आहे.
२०१९ मध्ये कुणाचं पारडं जड होतं?
रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) विजयी मते : ५,८६,३१४
संजयमामा शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ५,००,५५०
ॲड. विजयराव मोरे (वंचित बहुजन आघाडी) मते : ५१,५३२
दौलत शितोळे (अपक्ष) मते : १२,८६९
विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ८५,७६४
ALSO READ  महाराष्ट्रात शिक्षक भरतीत महाघोटाळा : 2012 पासून प्रकार सुरू !

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000