कु. रोहिणी लठ्ठे एम. एस्सी. प्रवेश परीक्षेत विद्यापीठात प्रथम
कवठेमहांकाळ :
येथील पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागातील बी. एस्सी भाग-३ मधील कु. रोहिणी लठ्ठे या विद्यार्थीनीने शिवाजी विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम. एस्सी. प्रवेश परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला असून तिने मार्च २०२४ मध्ये झालेल्या विद्यापीठ परीक्षेमध्येही २०० पैकी १९७ गुण मिळविले आहेत. या प्रवेश परीक्षेमध्ये अक्षय नागणे या विद्यार्थ्याने पाचवे स्थान मिळविले असून याशिवाय या यादीमध्ये कु. लक्ष्मी माने, प्रणव कूट्टे , प्रतीक ओलेकर, कु. स्वप्नाली सावंत आदी विद्यार्थ्यांचा ही समावेश आहे. २०२०-२१ मध्ये महाविद्यालयात नव्याने सुरू झालेल्या संख्याशास्त्र विभागाने गेली चार वर्षे ऊज्वल यशाची परंपरा राखली असून यंदाही विभागाचा निकल १०० टक्के लागला असून कु. रोहिणी लठ्ठे, कु. श्वेता पाटील आणि कु. लक्ष्मी माने या विद्यार्थीनी अनुकमे प्रथम,द्वितीय आणि तृतिय क्रमांक प्राप्त केले आहेत. विभागाकडे सुसज्ज संगणक प्रयोगशाळा आणि पुरेसा शिक्षकवर्ग असून येथे जत, सावळज, मिरज आदी महाविद्यालयातून तृतीय वर्षासाठी विद्यार्थी प्रवेश घेतात. विभागातिल विद्यार्थ्यांनी कोरोना काळात घरोघरी जाऊन लसीकरण सर्वेक्षण केले असून यातून काढलेल्या निष्कर्षामुळे लसीकरणाची माहिती ग्रामीण जनतेला मिळाली तसेच लसीकरणाविषयीचा गोंधळ, संशय दूर होण्यास मदत झाली. गेल्यावर्षी विद्यार्थ्यांनी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वापर आणि गुणवत्ता या विषयावर सर्वेक्षण करून संशोधन अहवाल शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजित परिसंवादामध्ये सादर केला होता. याशिवाय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदामध्ये सहभाग घेऊन संशोधन लेखांचे सादरीकरंणही केले आहे. विभागाला गेल्या चार वर्षामध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डि. टी. शिर्के यांच्यासह प्र. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे , डॉ. एस. बी. महाडिक, डॉ. गिरीश मोरे, डॉ. प्रदीप सरवदे , प्र. प्राचार्य अरविंद येलपले, डॉ. किरण पोतदार, डॉ. सोमनाथ पवार, प्रा. सुकुमार राजगुरू, डॉ. ए. ए. कलगोंडा, प्रा. लतिका शिंदे, प्रा. अर्चना मोरे, प्रा. धनंजय कलंगे, प्रा. राजेंद्र खराडे , प्रा. वाय. एस. पाटील, प्रसाद शिंदे, एड. विद्या पवार, प्राचार्य आर. जी. कुलकर्णी, डॉ. श्वेता मेहता, डॉ. सुनील कांबळे, डॉ. अशोक बाबर, डॉ. बी. पी. लाडगावकर, डॉ. एस. टी. साळुंखे, डॉ. जे. डी. म्हेत्रे, डॉ. के. डी. कुचे, करिश्मा गडीकर, असिफ शेख, ऋषिकेश जगताप,राहुल देवकते, अण्णासाहेब सूर्यवंशी, डॉ. सर्जेराव पोवार, डॉ. संतोष बाबरे, सुनील देवकते, अक्षय पाटील, गुरुदास शिंदे,
प्रा. देवेंद्र पाटील, डॉ. आर. व्ही. देशपांडे, डॉ. पी. एस. कांबळे आदी अनेक मान्यवरांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विभागाच्या कामकाजा बद्दल समाधान व्यक्त केले आहे. कोरोना कालावधीमध्ये पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. अनिल गोरे, माजी प्राचार्या डॉ. कुमुद गोरे, डॉ. पी. जी. दीक्षित, सलीम पानवाले आदी मान्यवरांनी वेबीनार मधून व्हाय स्टडी स्टॅटिस्टिक्स, डॉ. सी. आर. राव , फॅसीनेटिंग स्टॅटिस्टिक्स आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर मार्गदर्शन केले आहे. विभागाने शैक्षणिक सहल, फील्ड विजिट याबरोबरच डॉ. सी. आर. राव, डॉ. पी. व्ही. सुखात्मे, डॉ. पी. सी. महालानोबीज, फ्लोरेंस नाईनटिंगल यांच्या जयंती/ पुण्यतिथि साजऱ्या करून त्यानिमिने क्विज,पोस्टर प्रेझेंटेशन, निबंध, वक्तृत्व आदी स्पर्धांचे आयोजन केले आहे. विभागाचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात, विविध पदावर कार्यरत आहेत. विभागाच्या सर्वच उपक्रमांना शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, सचिव सुदर्शन शिंदे, य. च. म. मुक्त विद्यापीठ केंद्रप्रमुख विशाल शिंदे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत आहे. विभागामध्ये प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, प्रा. विजय कोष्टी, प्रा. सौ. शीतल कदम, प्रा. गणेश सातपुते, प्रा. कु. स्नेहल झरेकर, प्रा. सौ. स्नेहल पाटील सध्या कार्यरत असून यापूर्वी विभागामध्ये प्रा.अभिलाष पाटील, प्रा. शुभांगी भोसले आणि प्रा. प्राजक्ता पाटील यांनी काम केले आहे.