३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मोटरमन चंद्रशेखर सावंत सेवानिवृत्त

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे
पश्चिम रेल्वे चे मोटरमन चंद्रशेखर सावंत हे नुकतेच ३१ मे रोजी नियत वयोमाना नुसार रिटायर्ड झाले.आपल्या ३३ वर्षाच्या सेवेत त्यांनी अनेक चांगली कामे केली आणि आजवर त्यांना यासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. ३ जुलै २०१८ रोजी अंधेरी गोखले ब्रीज रुळावर कोसळला त्यावेळी वेळेचे आणि काळाचे भान राखून त्यांनी काही सेकंद आधी ट्रेन थांबविली अन्यथा ब्रीज लोकलवर कोसळून मोठी दुर्घटना झाली असती.या चतुराई आणि चाणाक्ष नजरे साठी त्यांना रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी आदर्श मोटरमन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.तेव्हा मिळालेल्या रोख ५ लक्ष रूपयां पैकी त्यांनी जवळपास ३ लाख रु समाजसेवेसाठी खर्च केले.सध्या ते जॉय ऑफ गीवींग या संस्थेचे मुंबई अध्यक्ष म्हणून कार्यरत असून यापुढे संपूर्ण वेळ सामाजिक कार्यासाठी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.रेल्वेत कामाला लागण्यापूर्वी ते ६ वर्ष भरतोय सैन्यात कामाला होते.आज सेवा निवृत्तीचे वेळी देखील त्यांनी भेट म्हणून मला पुस्तक द्या आणि जमा झालेली पुस्तकं मी एखाद्या शाळेतील लायब्ररी साठी देणार असल्याचे सांगितले आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांच्या बरोबर निवृत्त झालेले  बी एम मोरे, तसेच व्ही आर एस घेतलेले अजित सोनी, नरेश अगरवाल, संजीव मुकुंदन, महेश पार्सेकर, दिनेश मोर्य हे मोटरमन आणि त्यांचे कुटुंबीय तसेच ADEE निवांत साहेब, मनोजकुमार साहेब, लोको इन्स्पेक्टर संजय धवणे आदी मान्यवर त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी चर्चगेट येथील कार्यालयात उपस्थित होते.
ALSO READ  मंगळवेढा पोलीसांची उत्कृष्ठ कामगिरी

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000