गडब:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. एकही उमेदवार नसताना मनसे प्रचारात सक्रिय आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. १०) पुण्यामध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत त्यांनी हिंदू मुस्लिम मुद्द्याचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली.
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला.
ते म्हणाले की, राज ठाकरे हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या यादीत योग्य आहेत. महाराष्ट्राची जनता हे जाणून आहे. त्यांना दिल्लीमध्ये बोलावून फाईल दाखवून सांगितले की प्रचार आमचाच करावा लागेल. म्हणून मजबुरीने त्यांना भाजपचा प्रचार करावा लागत आहे.