सोलापूर शहरासह मंगळवेढा, सांगोला भागात मनोज जरांगे-पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षण प्रश्नावर या नेत्यांच्या चुकांमुळे यंदा लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघातून सभा घेण्याची वेळ आहे. मोदी यांना महाराष्ट्र कळलाच नाही. यात त्यांचा दोष नाही. तर भाजपच्या राज्यातील नेत्यांचा आहे, अशी टीका जरांगे यांनी केली. लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाज कोणाला समर्थन दिले नाही वा कोणाला विरोधही केला नाही. परंतु मराठा आरक्षण प्रश्नी सगेसोयरे आणि मराठा-कुणबी एकच असल्याच्या मुद्यावर ज्यांची मदत मिळणार आहे, त्यांच्या बाजूने सकल मराठा समाज उभा राहणार आहे. तर  ज्यांनी विरोध करून त्रास देत मराठा समाजाचा द्वेष केला, त्यांना पराभूत करायला मराठे पुढे सरसावतील. हा करेक्ट कार्यक्रम लवकरच दिसेल, असेही मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

ALSO READ  राज्यातील सर्वात मोठे गाव चलो अभियान सांगोल्यात राबविले- चेतनसिंह केदार-सावंत