आंतरराज्य सिमजोड रस्त्याचे काम महिन्यापासून बंद! गुतेदाराची हलगर्जी की पदाधिकाऱ्याचा उपद्व्याप सस्पेन्स कायम?

वर्ल्ड बँकेच्या अर्थसहायातून मिळाला आहे निधी..
धर्माबाद:
 वर्ल्ड बँकेच्या विशेष अर्थसहायातून सुमारे १३५० कोटी रुपयांचा मुबलक असा निधी मिळून देखील आंध्र बसस्टॉप ते बाळापूर या ठिकाणचे अंतरराज्य सिमाजोड महामार्गाचे काम रखडले आहे. जवळ जवळ एक महिन्यापासून काम बंद पडले असल्याने उखडलेल्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांचे लहान मोठे अपघात होऊन दुखापत होत तरी देखील काँट्रक्टर काम सुरू करीत नसल्याने हे काम का बंद पडले ? व काम कधी सुरू होणार ? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
सद्या आदर्श आचारसंहिता चालू असल्याने लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पक्षांचे नेते याकडे लक्ष घालत नाहीत किंवा तो विषय बाजूला ठेवत आहेत पण प्रशासकिय अधिकारी तरी गुतेदारास जाब विचारून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी नोटीस बजावण्यास का चालढकल करीत आहेत असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे.
जागतिक बँकेच्या वतीने विशेष बाब म्हणून सुमारे १३५० कोटी रुपयांचा निधी या आंतरराज्य सीमजोड रस्त्यासाठी मिळाला काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या अटीवर टेंडर देण्यात आले मग कामास अडकून ठेऊन केवळ वेळ मारून नेण्यात का येते आणि यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का होते हे मात्र कोणालाही कळत नाही.
रस्ता उखडून टाकला असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे अपघात होत आहेत यास जबाबदार कोण आणि भविष्यात दुर्घटना घडली तर दाद कुणाकडे मागावे आशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.
उखडून ठेवण्यात आलेल्या सदरील रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत,याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे.हे काम थांबविण्या संदर्भात शहरातील सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा अट्टाहास असल्याचे एका व्हायरल ऑडियो तुन दाखवले जात आहे. गुतेदाराच्या प्रतिनिधींकडून खाजगी व्यक्तीशी झालेल्या सवांदातुन ही बाब समोर आली.तो पदाधिकारी नेमका अट्टाहास जनहितासाठी करतोय की स्वर्थसाठी हे मात्र सस्पेन्स कायम राहीला आहे.
ALSO READ  अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत धर्माबाद रेल्वे स्थानकाचा पायाभरणी शुभारंभ

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000