राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्रजी पवार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

सांगोला:
शनिवार दिनांक 09/03/2024 रोजी दुपारी 2:00  वाजता शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक ज्येष्ठ नेते मा. बाबुरावजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री बाबुराव गायकवाड यांनी या पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवणारा  माणूस हे  तालुक्यातील सर्व मतदारापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले,त्याचप्रमाणे पक्षवाढीसाठी पक्षाचे जास्तीत जास्त सभासद करून सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तालुक्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी नियुक्त करण्यासाठी व पक्षाची ध्येय धोरणे तालुक्यातील मतदारापर्यंत पोहोचविण्यासाठी दिनांक 13/03/2024
रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात तालुक्यातील शरदचंद्रजी पवार साहेब प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी प्रमुख कार्यकर्त्यांना केले.सदर बैठकीसाठी खालील मान्यवर उपस्थित होते.माजी आमदार डॉ. रामचंद्र साळे, श्री. विश्वंभर काशीद,श्री.साहेबराव ढेकळे सांगोला डॉ. धनंजय पवार, श्री. शशिकांत गव्हाणे, श्री. मोहसीन तांबोळी, श्री. बाबुराव खंदारे, महादेव पाटील -माजी सरपंच सोनंद, श्री. मधुकर सपाटे -माजी सरपंच वाकी -शिवणे, इंजि. एम.आर. गायकवाड, शरद मोरे कडलास, श्री. महादेव पवार वाटंबरे, फिरोज शेख, सांगोला, चंद्रकांत शिंदे कडलास, औदुंबर केदार कडलास, मधुकर साळुंखे बामणी, लहू पवार वाटंबरे, बाळासाहेब पवार वाटंबरे, दीपक काशीद सोनंद, मोहसीन तांबोळी सांगोला, आशिष माने सांगोला, सैफुल मुजावर सांगोला, बाबू घोरपडे अकोला, प्रशांत तेली कडलास, शंकर लवटे कडलास, सुभाष लिगाडे कडलास, पांडुरंग काशीद कडलास, शरद गायकवाड कडलास, नवनाथ दिघे वाढेगाव, मनोज पाटील वाढेगाव, मौला मुलानी वाढेगाव, गणपत महांकाळ कडलास इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी डॉक्टर धनंजय पवार यांनी सर्वांचे आभार मानून बैठक संपली.
ALSO READ  चॉकलेटचं आमिष दाखूवन घरी नेलं, चिमुरडीवर अत्याचार; रिक्षा चालकाला १० वर्षांची जन्मठेप

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000