जीव लावलास तू आम्हाला
कष्ट करून घास भरवला या देहाला
कसं फेडावं तुझ्या या ऋणाला
आज आक्का म्हणावं आम्ही कुणाला
सोसून सारे दुःख तुझे
अश्रू वाहिले तू सागराला
आठवण होते तुझी प्रत्येक क्षणाला
परतुनी ऐ माघारी या घराला
नात्यागोत्यांचा भरला बाजार
दिसेना मला तुझा ग आधार
तुझ्या मायेच्या पदरात
राहीन मी ग जन्मभर उधार
दिव्य तुझ मूर्ति असे
हृदयात माझ्या स्थान
अक्काला माझ्या देतात
सर्व समाजात सन्मान
किती येतील किती जातील
उणीव तुझी ना भरून निघेल
अश्रूंची फुले तुला मी
ओंजळ भरून वाहील
कवयित्री- सौ. सुवर्णा रमेश तेली