असंख्य वादळे असले जरीही
मार्ग त्यातून निघतो हे सत्य
मोकळी वाट मिळते
असंख्य वादळाचा तो अंत
असंख्य वादळे असले जरीही
स्वतःला धीर दयावा फक्त
हसत करावा वारं त्यावर
सहानुभूती देऊन व्हावे व्यक्त
असंख्य वादळे असले जरीही
आयुष्याला दयावी किंमत
मार्ग निघतो अन यश ही मिळते
दाखवून दयावी आपली हिम्मत
असंख्य वादळे असले जरीही
पाऊल पुढेच असावं
नजर निवडलेल्या मार्गावर
हतबल स्वतःला नं समजावं
असंख्य वादळे असले जरीही
आत्मविश्वास कायम ठेवावं
समाधानी जगणं खरंच
जे मिळेल हसत ओंजळीत घ्यावं
सौ चैताली संगोपाल वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला