धर्माबाद (तालुका प्रतिनिधी ):
धर्माबाद शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणात चॅम्पियन ट्रॉफी चे आयोजन करण्यात आले होते. धर्माबाद न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती सपना हरणे यांच्या संकल्पनेतून व नगरपरिषद धर्माबाद यांच्या सौजन्याने धर्माबाद उमरी आणि बिलोली येथील न्यायालयीन कर्मचारी व धर्माबाद येथील प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे क्रिकेट खेळाचे सामने आयोजित करण्याचा हेतू श्रीमती सपना हरणे यांचा होता. सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी——चौकट—– *धर्माबाद न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती सपना हरणे म्हणाल्या की यामागचा मुख्य उद्देश दैनंदिन कामाच्या ताणतणावातून कर्मचाऱ्यांना थोडासा दिलासा मिळावा धावपळीच्या ह्या जनजीवनात व्यस्ततेत जीवन जगत असताना आपल्या शरीरावर लक्ष देणे सुद्धा तेवढेच गरजेचे बनलेले आहे सर्व कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक सुदृढता ही महत्त्वाची आहे असे मत उद्घाटन प्रसंगी धर्माबाद न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती सपना हरणे यांनी व्यक्त केले*. चॅम्पियन ट्रॉफी च्या खेळवल्या गेलेल्या या सामन्यात एकूण आठ टीम यामध्ये सहभागी झाल्या होत्या तर या टीम मध्ये सात सामने खेळवण्यात आले सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये धर्माबाद न्यायालय, धर्माबाद पोलीस स्टेशन ,धर्माबाद महसूल कार्यालय ,धर्माबाद पंचायत समिती, उमरी न्यायालय, बिलोली न्यायालय आणि बिलोली वकील संघ अशा संघाचा समावेश होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सेमी फायनल मध्ये धर्माबाद पोलीस स्टेशन विरुद्ध धर्माबाद नगरपरिषद हा सामना अत्यंत रोमहर्षक झाला यामध्ये धर्माबाद नगर प्रशासनाने विजयश्री खेचून आणली तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये धर्माबाद न्यायालय यांच्याविरुद्ध धर्माबाद महसूल प्रशासन यांच्यामध्ये हा सामना झाला. अंतिम सामन्यांमध्ये धर्माबाद नगर प्रशासन व धर्माबाद महसूल प्रशासन यांच्यामध्ये अंतिम सामना होऊन अंतिम सामना हा धर्माबाद नगरपालिकेने निर्विवाद जिंकला या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून धर्माबाद नगर परिषदेचे टॅक्स ऑफिसर गोविंद जक्कावाड हे मानकरी ठरले . या सामन्याला प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डी इ कोठलीकर जिल्हा न्यायाधीश 1बिलोली, माननीय श्री व्ही बी बोहरा तदर्थ जिल्हा न्यायाधीश बिलोली, माननीय श्री ए ए के शेख दिवाणी न्यायाधीश बिलोली, मा.श्रीमती एस ए हरणे दिवाणी न्यायाधीश धर्माबाद, मा.श्री ए बी रेडेकर दिवाणी न्यायाधीश उमरी, श्रीमती स्वाती दाभाडे उपविभागीय अधिकारी धर्माबाद श्रीमती नीलम कांबळे प्रभारी मुख्याधिकारी धर्माबाद यांची प्रमुख उपस्थिती होती. *धर्माबाद नगरपालिकेच्या टीमचे कुशल नेतृत्व धर्माबाद नगरपालिकेचे लेखाधिकारी गुरुनाथ कस्तुरे यांनी केले होते. ————चौकट———- विजया नंतर धर्माबाद नगर परिषदेच्या क्रिकेट टीमचे कर्णधार व नगरपरिषदेचे लेखाधिकारी गुरुनाथ कस्तुरे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की विजय पराजय हा खेळाडू वृत्तीने स्वीकार्याचा असतो खेळामध्ये तो निश्चित आहेच परंतु दैनंदिन जीवनामध्ये नगरपालिकेत काम करत असताना आम्ही सर्व टीम एक परिवार म्हणून काम करतो आज त्याचे फळ आम्हाला मिळाले. मैदानावर असू द्या किंवा कार्यालयात असू द्या सर्व कर्मचाऱ्यांचे जीव ओतून काम केले तर निश्चितच ते कार्य यशस्वी होते आणि त्याचीच प्रचिती आम्हाला आज या खेळामध्ये मिळाली आहे. धर्माबाद नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकसंघतेने जो खेळ खेळला त्यातून इतरांनी ही प्रेरणा घ्यावी आणि आपल्या कार्यालयात अशीच एकी कर्मचाऱ्यांमध्ये असावी जेणेकरून आपल्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळतच जाईल धर्माबाद शहराला स्वच्छ सुंदर शहर करण्यासाठी सुद्धा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा असाच प्रयत्न आहे फक्त गरज आहे धर्माबाद मधील सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करण्याची आणि ते उत्तमपणे धर्माबाद चे नागरिकांना सहकार्य करीत आहेत* —— धर्माबाद नगर परिषदेच्या टीम मध्ये राजेश स्वामी, संतोष मुंडे, रामसिंग लोध, गोविंद जक्केवाड, रवी उमडे, नागेश अपलोड, संतोष पवार, किरण बिचकेवार, सूर्यकांत पौळ, गंगाधर सूर्यवंशी, लक्ष्मण झुंजारे या सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता तरी या टीमला मार्गदर्शन म्हणून परिषदेचे प्रशासक स्वाती दाभाडे धर्माबाद नगर पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. आयोजित केलेला चॅम्पियन ट्रॉफी यशस्वी
करण्यासाठी प्रशिक्षणासाठी गेलेले धर्माबाद नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश पुदाके यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन या टीमला होते धर्माबाद नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक रुखमाजी भोगावार, दत्तू गुर्जलवाड ,अशोक घाटे यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले.