बायोमेट्रिक मशीनने अंगठा घेत भामट्यांनी गायब केले बोंडे गावातून खात्यातून १० हजार ; साकोलीत विधवा महिलांनी सतर्क रहावे-तहसील व पोलीस प्रशासनाचे आवाहन
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली तालुक्यात काही ग्रामीण भागात अनोळखी इसम येत बायोमेट्रिक मशीनने अंगठा घेत दहा हजारांची अनेक ठिकाणी फसवणूक झाली. याची तक्रारी पोलीसांकडे प्राप्त झाले असून साकोली पोलीसांनी तडकाफडकी यांची चौकशी सुरू केली आहे. व तहसील कार्यालय आणि पोलीस ठाणे यांनी जनतेला सतर्क रहा असे आवाहन केले आहे.
काही दिवसांपूर्वी “साकोली पोलीस मित्र मिडीया” या व्हाट्सअप ग्रुपमध्ये पोलीसांनी ही खबरदारी घेत पोस्ट केले यात “पोलीस स्टेशन साकोली परिसरात एक अज्ञात ईसम खेडेगावातील विधवा महिलांच्या घरी जावुन, मी साकोली तहसिल कार्यालयातून आलो आहे. निराधार विधवा महिलाचे सर्वे करणे सुरु आहे. असे सांगुन तो आपले कडुन आधार कार्ड क्रमांक घेत त्यांचे कडील बोयोमेट्रिक मशीन मध्ये आपले फिगर प्रिंट घेत आपले बँक मधील पैसे काढुन घेवुन फरार होत आहे. तरी अश्या फसव्यागिरापासुन सावधान,
सदर ईसम हा आपले गावात पुन्हा अशा प्रकारचे विधवा महिला सोबत फसवेगिरी करुन बैंकखाते मधील पैसे काढुन फसवेगिरी करु शकतो” कारण नुकतेच बोंडे, खंडाळा, सावरबांध, विर्शी, एकोडी येथील पिडीतांनी सांगितले की फुलचुर गोंदिया येथील “शैलेश नाईक” हा इसम येत त्याने तहसील कार्यालयातून आलो सांगितले आणि निराधार योजनेचे यादी दाखवित ही फसवणूक केली. असे आज दि. २४ ला बोंडे येथील पिडीता विधवेचा मुलगा “अतुल” ने “युवाराष्ट्र दर्शन” ला सांगितले. याबाबद तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. यावर साकोली पोलीसांनी आता उच्चस्तरीय चौकशीसाठी पथक नेमले असून याप्रकारे कुणी आढळून आल्यास त्यास गावकऱ्यांनी पकडून ठेवीत तातडीने ११२ किंवा ०७१८६ – २३६१३३ यावर फोन करावा. या संतप्त प्रकरणी विधवा महिलांचे शासकीय पैशे गडप करणा-यांचे धागेदोरे शोधून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी व त्यांचे पैशे परत करण्याची मागणी साकोली शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष दिलीप मासूरकर यांनी केली आहे.
- “याप्रकारे कुणी गावात तहसील कार्यालयाचे नाव घेऊन व थम्स मशीन घेऊन आल्यास त्याला तिथेच गावकऱ्यांनी पकडून ठेवा आणि तातडीने वरील क्रमांकावर फोन करा, अश्या भामट्यांवर विश्वास ठेऊन कोणतेही कागदपत्रे सादर करू नये व सुरक्षा कोड खाते क्रमांक सांगू नये”
— पोलीस निरीक्षक साकोली • राजेशकुमार थोरात
- “मागे आम्ही निराधार विधवांची यादी तहसिल कार्यालयात लाभार्थ्यांसाठी जनहितार्थ लावली होती, सदर यादी आपण कुणालाही देत नाही कारण हे शासकीय दस्तऐवज असतात, कुणी लावलेल्या शासकीय यादीची छायाचित्रे काढून हा प्रकार करीत आहेत. यात तहसिल कार्यालयाने असे कोणतेही कर्मचारी गावोगावी पाठविलेले नाहीत, अशी सुचनाही तहसीलदार निलेश कदम यांनी दिली आहे, जनतेनी अश्या लबाडखोरांना जागीच ओळखून साकोली पोलीस ठाणे येथे संपर्क साधा”
— नायब तहसीलदार • एस. सी. शेंडे – तहसील कार्यालय साकोली