महादेव कानकेकर
तुफान क्रांती राजू चव्हाण
आपल्या व्हॉलीबॉल खेळामुळे मुरगूडचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेणारे व अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणारे एम.बी. सुतार यांच्या व्हॉलीबॉल खेळातील बोगदानाचे सामाजिक ऋण फेडण्यासाठी त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार व गौरव समारंभ आयोजित करण्याचे ठरविले आहे.आशी माहिती माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांनी दिली
मुरगूडचे सुपुत्र एम.बी. सुतार यांनी आपल्या जबरदस्त स्मॅशिंगच्या जोरावर 1971 ते 1981 च्या दशकात मुरगुड चे नाव राष्ट्रीय पातळीपर्यंत पोचवले आहे. तसेच अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू तयार केले आहेत. त्याकाळी मुंबईतील कंपनीत व्हॉलीबॉल खेळाडू म्हणून संधी मिळाली असतानाही केवळ मुरगूड व व्हॉलीबॉल वरील प्रेमापोटी त्यांनी नोकरी नाकारली. आज त्यांच्या वयाला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
व्हॉलीबॉल क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सपत्नीक यथोचित सत्कार – गौरव करण्याचा मनोदय व्हॉलीबॉल क्षेत्रातील व व्हॉलीबॉल शौकिनांकडून व्यक्त करण्यात आला. त्यास अनुसरून व्हॉलीबॉलपटू एम. बी. सुतार गौरव समिती स्थापन करून सर्वांच्या वतीने त्यांचा सपत्नीक गौरव समारंभ 1 जून 2024 रोजी करण्याचे सर्वांच्यावतीने ठरवण्यात आले आहे.
याकरिता व्हॉलीबॉलपटू एम. बी. सुतार गौरव समितीच्या वतीने आर्थिक निधी संकलन करीत आहोत. या निधी संकलनामध्ये सर्व व्हॉलीबॉल खेळाडू, शौकीन, विविध संस्था पदाधिकारी, व्यावसायिक, राजकीय नेते, नोकरदार, हितचिंतक, मित्रमंडळी ग्रामस्थ यांनी सहभागी होऊन समारंभ यशस्वीरित्या पार करण्यासाठी मोलाचे सहकार्य करावे आशी समिती चे अध्यक्ष श्री कानकेकर यांनी विनंती केली
यावेळी
, सचिव बाळासो सुर्यवंशी , कार्याध्यक्ष – कॉम्रेड बबन बारदेस्कर
एम डी रावण ,धोंडीराम मकानदार ,अशोक देवळे , दत्तात्रय मंडलिक , सुहास खराडे , आनंदा गोधडे, शाहू फर्नांडिस ,,सुशांत मांगोरे सदाशिव गोधडे ,किसन बारदेस्कर , विलास भारमल ,शशिकांत दरेकर , संभाजी मांगले , विजय गोधडे ,सुनील घाटगे , पांडूरंग कुडवे , चंदकांत बरकाळे , के डी मेंडके
व्हॉलीबॉलपटू एम.बी. सुतार गौरव समिती मुरगूड, ता. कागल