वनविभाग सांगोला मोठी कारवाई विनापरवाना वाहतुक आयशर क्र. MH-12 NX 9255 कोळसा मालासह जप्त

सांगोला:
वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी मौ. पारे ते डिकसळ रस्त्यावर ता. सांगोला येथून दि. 13.06.2024 रोजी विनापरवाना कोळसा पोती 85 वाहतूक करताना आयशर क्र. MH-12 NX 9255 जप्त केला.
मौ. पारे ते डिकसळ रस्त्यावर माल वाहतूक करत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल जुनोनी, वनरक्षक घेरडी व वनमजूर जुनोनी यांनी कारवाई केली. मौ. पारे ते डिकसळ रस्त्यावर येथे दि. 13.06.2024 रोजी गस्त करत असताना दुपारी 02.00 वा. च्या दरम्यान वाहनांची तपासणी केली असता आयशर क्र. MH – 12 NX 9255 यामध्ये कोळसा पोती 85 विनापरना वाहतूक होत असल्याचे दिसुन आले. 1) आयशर मालक व ड्राव्हर अमित तिपन्ना धाबे रा.मुचंडी ता.जत जि.सांगली 2) व्यापारी शंकरलिंग तिपन्ना धाबे रा. मुचंडी ता.जत जि. सांगली या दोघांनी कोळसा विनापरवाना वाहतूक करत असताना पकडले. यांचेकडे वनविभागाचा वाहतूक पास नसल्यामुळे सदरचा आयशर कोळसा पोती 85 मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला शेजारी ठेवण्यात आला आहे.
आयशर मधील कोळसा पोती 85 किंमत अंदाजे 25,000/- रु. आहे. वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी. अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे. अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा मोबाईल नंबर 9420378279 वर संपर्क साधावा, असे आव्हान केले आहे. सदरची कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे श्री. एन. आर. प्रवीणसाहेब, मा. उपवनसंरक्षक, सोलापूर • श्री. धैर्यशील पाटील व मा. सहा वनसंरक्षक (कॅम्पा), सोलापूर श्री.बी. जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची कारवाई श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, श्री.एस.एल. वाघमोडे – वनपाल – जुनोनी, वनरक्षक घेरडी श्री.एस.एस. मुंढे, तसेच वनमजूर यांनी केली.
ALSO READ  राज्यातील सर्वात मोठे गाव चलो अभियान सांगोल्यात राबविले- चेतनसिंह केदार-सावंत

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000