पंढरपूर सिंहगड मध्ये नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळा

पंढरपूर सिंहगड मध्ये नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळा

पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शनिवार २७ जानेवारी २०२४ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानतून नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे विशेष निमंत्रित सदस्य डाॅ. प्रशांत साठे, पश्चिम क्षेञ क्षेञीय संघटन मंञी देवदत्त जोशी यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
  यादरम्यान बोलताना डाॅ. प्रशांत साठे बोलताना म्हणाले, केंद्र सरकारने नुकतेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले असून येत्या काळात सध्या प्रस्थापित असलेला शिक्षणव्यवस्थेचा ढाँचा संपूर्ण बदलून नाविन्यपूर्ण रचना नव्या धोरणात प्रस्तावित करण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात्मक वैशिष्ट्य अभ्यासणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे स्कील हे एक वैशिष्ट्य आहे. बिझनेस, अकाऊंट  तसेच अन्य स्किल आवश्यक आहे.नव्या पॅटर्ननुसार, बोर्डाच्या परीक्षेचं महत्त्व कमी होणार असून सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना शिक्षकांची भूमिका कोणती? शिक्षणातील तोचतोचपणा घालवून शिक्षकांनी आपले ज्ञान अद्ययावत करणे कसे आवश्यक आहे, यासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. आता अलीकडे गुरू आणि गुगलची तुलना समाज करत असताना शिक्षकाने आपण गुगलपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करण्याची वेळ आली असल्याचे या वेळी डाॅ. प्रशांत साठे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले.
    या कार्यशाळेत एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उप प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी सह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
पंढरपूर सिंहगड मध्ये नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळा
ALSO READ  सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच 

Leave a Comment

‘झलक दिखला जा 11’वर अत्यंत गंभीर आरोप, लोकांचा संताप, शिव ठाकरेचे चाहते आक्रमक TOP POINTS Farmer’s Protest: Continuing Until Demands Met Best Phones Under 20,000 Top 10 Wireless Earbuds Under 2000