एसटी डेपो नांदेड आगार येथे चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा
नांदेड- एसटी महामंडळाच्या आगार पातळीवर प्रवाशी वाहतुकीत दैनंदिन कामगिरी करत असताना चालक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाकरीता सतत प्रयत्न करणाऱ्या चालकांच्या योगदानाचा यथोचित सन्मान होणे व चालकांना सुरक्षित वाहतुकीसाठी प्रेरणा मिळणे या दृष्टीकोनातून दि. २४ जानेवारी २०२४ हा दिवस संपूर्ण भारत देशात चालक दिन म्हणून साजरा करण्याबाबत असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकींग (अॅस्ट्रो) या केंद्रीय संस्थेअंतर्गत संपूर्ण भारत देशातील परिवहन उपक्रमामार्फत २४ जानेवारी २०२४ हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देशित केलेले आहे, याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगारात सकाळी ठिक ११ वाजता चालक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक अशोकराव चव्हाण हे होते तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वजिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजीव मुत्तेपोड, एसटीचे नांदेड विभाग नियंत्रक दत्तात्रय कुलकर्णी, यंत्र अभियंता (चालन) मंगेश कांबळे, उपयंत्र अभियंता निलेश तागड, विभागीय भांडार अधिकारी दिनेश अवघन, स्थापत्य बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सौ. धम्मदीक्षा पोहरे, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, वाहतुक निरीक्षक शेख मोबीन, वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे, राजेश कांबळे, दिलबागसिंघ गडगज, छायाचित्रकार केशव टोणगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आगारातील उत्कृष्ट २४ चालकांचा प्रातिनिधीक स्वरुपात पुष्पहार, गिफ्ट, मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. तर इंधन बचत (के.पी.टी.एल. किलोमीटर प्रति टेन लिटर) उत्तमरित्या वाहन चालवून कार्य बजावल्याबद्दल प्रातिनिधीक स्वरुपत ५ चालकांचा सन्मान करुन गौरविण्यात आले. यावेळी वरील सर्व मान्यवरांनी चालक दिनानिमित्त समयोचित मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षीय समारोप अशोकराव चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन यासीन हमीद खान यांनी मांडले. या प्रसंगी आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, कामगार- कर्मचारी, बंधु आणि भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.